लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये या दिवशी महिलांच्या खात्यात जमा Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30 पर्यंत वाढवण्यात आलेली होती. जुलै महिन्यामध्ये या योजनेची घोषणा झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आलेली नव्हती.

त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकलेली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागलेला होता. आता या महिलांनासुद्धा 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती

अर्ज मंजूर प्रक्रिया बदलली:

आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहे. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. अर्थात, अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा उपक्रम:

या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया देखील निश्चित करण्यात आली आहे.

ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेले आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, अशा महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारण या महिलांना ऑगस्ट,जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे आता 3 ही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळणार आहे.

अन्य महिलांच्या खात्यातही पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका अंदाजानुसार, येत्या 19 ऑक्टोबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना काय लाभ मिळणार?

Leave a Comment