इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा e-pik pahani list 2024of
e-pik pahani list 2024 : खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता
येणार आहे. यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता.
ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी रद्द करण्यात आली आहे? याची सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.
शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उताऱ्यावर नोंदवणं याला ई-पीक पाहणी असं म्हटलं जातं. गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे
. पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani (DCS) असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Install वर क्लिक करायचं आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जाते. MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो. पीक कर्जाच्या पडताळणीसाठी – तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का, याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते.
100 च्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत. पीक विमा योजनेच्या लाभासाठी – पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक, यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं.
नुकसान भरपाईसाठी – नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.
राज्य सरकारनं गेल्यावर्षीच्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
पण यावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आणि त्यात सोयाबीन-कापूस नोंद आहे त्यांनाच लाभ मिळेल असं सांगण्यात आलं होतं. सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा,👈👈👈👈